नागपूर - महाराष्ट्रातले सरकार एकमेव असे सरकार आहे की, ज्यांनी कोविड काळात काहीही मदत केली नाही. अन् वरून म्हणते केंद्र सरकारने मदत केली नाही. पण वस्तुस्थिती अशी आहे की, केंद्र सरकारने २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज गेल्या वर्षभरात दिले. देशातल्या इतर राज्यांनीदेखील पॅकेज दिलेले आहे. महाराष्ट्राने एक पैशाचं पॅकेज तर दिलंच नाही. पण त्याच्याऐवजी या सरकारने वीज कनेक्शन कापणे, लोकांना त्रास देणे यावरच भर दिला. संपूर्ण देशातलं आपल्या राज्यातील लोकांना त्रास देणार राज्य हे महाराष्ट्र आहे. अशाही स्थितीत जितेंद्र आव्हाड जर टिका करत असतील, तर त्यांना विस्मरणाचा रोग झाला आहे, असे मला वाटते.
#DevendraFadnavis #UddhavThackeray #jitendraawhad #Maharashtra
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics